Breaking news

पुस्तक महोत्सवात 700 व अधिक पुस्तकांचे प्रदर्शन; स्मार्टफोन व इंटरनेटच्या युगातही पुस्तकाचे महत्व कायम

मावळ माझा न्युज नेटवर्क : पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित पुस्तक महोत्सवामध्ये लोणावळा येथील व्ही.पी.एस व द.पू मेहता कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्मार्टफोन व इंटरनेटच्या युगातील पुस्तकांचे महत्त्व किती आहे हे त्यांनी यामध्ये समजावून घेतले. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अतिशय भव्यदिव्य असे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये जवळजवळ 700 हून अधिक पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत. या महोत्सवाला भेट देण्यासाठी तसेच पुस्तकांचे महत्त्व समजून घेण्यासाठी व्ही.पी.एस व द.पू मेहता कॉलेजमधील विद्यार्थी प्राध्यापक सचिन लांडगे व प्राध्यापक कल्याण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गेले होते. यामध्ये प्रवीण पाटील, रेवती बोके, मयूर विटे, पिंकी त्रिपाठी, शिल्पा भालेराव, भूमिका सिंगासने या शिक्षकांनी देखील मुलांच्या बरोबर सहभाग घेऊन पुस्तक महोत्सवाचा आनंद घेतला.

      स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात पुस्तकं वाचणं वेगानं कमी होत आहे. मात्र स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि त्यावर घालवलेला वेळ कधीच पुस्तकांची जागा घेऊ शकत नाही.  पुस्तक वाचण्याचा छंद माणसाला आनंद आणि मानसिक समाधान देतो. सोबतच पुस्तक वाचल्याने मानसिक आणि भावनिक आरोग्यही चांगलं राहतं. पुस्तकांच्या माध्यमातून आपण एका जागी बसून जगभरात प्रवास करू शकतो. सोबतच आपण इतिहास, समाज, संस्कृती यांची सविस्तर माहिती मिळवू शकतो. पुस्तकं समाजाचा आरसा असतात. पुस्तकात जगाचं प्रतिबिंब बघायला मिळतं. अनेकांसाठी पुस्तक वाचणं कंटाळवाणं असू शकतं. मात्र काही लोकांना पुस्तकं अतिशय रंजक वाटतात. पुस्तकं वाचल्याने माहितीत भर पडते. आणि आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात व तणाव कमी होतो.                                                                              या उपक्रमामध्ये शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर, प्राचार्य उदय महेंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, तसेच उपमुख्याध्यापक सुहास विसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

इतर बातम्या