Breaking news

सिंहगड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वच्छ वारी - स्वस्थ वारी, निर्मल वारी - हरित वारी उपक्रम

लोणावळा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने  सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या लोणावळा संकुलातील सर्व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छ वारी - स्वस्थ वारी, निर्मल वारी - हरित वारी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस लोणावळा तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी चे एनएसएस चे स्वयंसेवक यांनी एनएसएस कार्यक्रम अधिकारी सतीश मेंडके, संतोष दबडे, सहदेव जाधव व अभय रामदिन तसेच महिला एनएसएस कार्यक्रम अधिकारी सुलक्षणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील नाना पेठ व पुल गेट या भागात दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांची सेवा केली. त्यांना खाऊ वाटप केला, सोबतच सभोवतालचा परिसर स्वच्छ करून स्वछता उपक्रम सुद्धा राबवला.

       या उपक्रमाला सिंहगड एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच लोणावळा कॅम्पस चे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, एस.के.एन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्या डॉ.  रुकसाना पिंजारी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी चे प्राचार्या डॉ. अंजली चॅटरटन, निवृत्ती बाबाजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशच्या संचालिका डॉ. विद्या नखाते, सिंहगड पब्लिक प्राचार्य डॉ. एन. के. मिश्रा, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच संस्थेने या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य आणि वाहतूक सुविधा देखील उपलब्ध करून उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

इतर बातम्या