Breaking news

व्यावसायिकांनी कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी - उप्र. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

मुंबई : मुंबई शहर व परिसरातील लोकसभेची निवडणूक पाचव्या टप्प्यांमध्ये 20 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी व्यवसायकांनी आपल्या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी. मतदान करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याने कामगार त्यापासून वंचित राहू नये याकरिता व्यवसायकांनी सहकार्य करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी केले आहे. नामदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील व्यवसायांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शर्मा उपस्थित होते. या बैठकीला हिरे व्यापारी व हिरे उद्योगपती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       यावेळी बोलताना डॉक्टर दिनेश शर्मा म्हणाले, देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्यांनी व उद्योगपतीनी आपल्या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावे तसेच त्यांचे मतदान करून घ्यावे. मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्यात यावा. मंगल प्रभात लोढा म्हणाले, देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगपतींनी आप आपल्या क्षेत्रांमधील उद्योगपती त्यांचे कामगार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याबाबतची जागृती निर्माण करावी जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल व देशांमध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आपण संसदेमध्ये पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करू. 

        समस्त महाराजांचे ट्रस्टी परेश भाई शहा यांनी सांगितले की, आम्ही आमचे सर्व सहकारी अहोरात्र काम करून भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले सर्व उमेदवार निवडून आणू. भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल म्हणाले, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे जास्तीत जास्त खासदार आणण्यासाठी मी व माझ्यासोबत सर्व उद्योगपती प्रयत्न करीत आहोत आणि या प्रयत्नामुळे मतदानाचा टक्का वाढेल. आम्ही सर्वजण महाराष्ट्रातले तसेच मुंबईतले भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष यांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्याची दक्षता घेऊ. राष्ट्रीय सेवक संघाचे किरीट भाई शहा यांनी सर्वांचे आभार मानले.

इतर बातम्या