Breaking news

समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट ची आढावा बैठक ठाण्यात संपन्न

मावळ माझा न्युज : समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट यांची वर्षभरातील कार्याचा आढावा घेणारी बैठक ठाणे येथील टीप टॉप प्लाझामध्ये पार पडली. अहमदाबाद येथील हिंदू साधू समितीचे अध्यक्ष स्वामी परमतानंदजी व जैन आचार्य लोकेश मुनीजी यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

        यावेळी बोलताना आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले, समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट ही संपूर्ण भारतामध्ये पशु वैद्यकीय उपचार साठी व प्रत्येक गाव खेड्यामध्ये जल व्यवस्था करण्यासाठी अनमोल कार्य करत आहे. तसेच त्यांनी प्रत्येक गावामध्ये देशी वृक्ष लावण्याचा जो संकल्प केलेला आहे तो कौतुकास्पद आहे.

        आचार्य परमतानंदजी म्हणाले, समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी यावर्षी 35 कोटी रुपयांचे सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. व भारत सरकारच्या जिवंत पशु विक्रीच जी व्यवसायाला परवानगी देण्यात आलेली होती त्यास त्यांनी केलेला विरोधामुळे भारत सरकारला त्या निर्णयावर फेर विचार करावा लागला. त्यांच्या अहिंसा प्रेमी कार्यास त्यांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी समस्त महाराजांचे अध्यक्ष गिरीश भाई शहा, परेशभाई शहा, भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        महाराष्ट्रातील हजारो गोरक्षक यांना मार्गदर्शन करताना गिरीश भाई शहा यांनी महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटावा व पशु कत्तलखाने बंद व्हावे म्हणून मार्गदर्शन केले. व आतापर्यंत त्यांनी 50 हजार पेक्षा जास्त पशुवर उपचार करत त्यांना जीवनदान दिले असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील हजारो अहिंसा प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या