Breaking news

भाटघर धरणात बुडून पुण्यातील पाच महिलांचा मृत्यू

पुणे : भोर तालुक्यामधील भाटघर धरणात बुडून पुण्यातील पाच महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली यापैकी चार मृतदेह शोधण्यात यश आले आहे सुदैवाने त्यांच्या सोबत असलेली एक लहान मुलगी बचावली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सर्व महिला नर्‍हे येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 

   खुशबू लंकेश रजपुत (वय 20, रा. बावधन), मनिषा लखन रजपुत (वय 20), चांदणी शक्ती रजपुत (वय 21), पूनम संदीप रजपुत (वय 22, तिघीही राहणार संतोष नगर हडपसर, पुणे), मोनिका रोहित चव्हाण (वय 23, रा. नर्‍हे, पुणे) अशी या मृत महिलांची नावे आहेत. यापैकी मनिषा यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत मिळून आला नाही. घटनेची माहिती समजताच प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील व पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. भोर येथील सह्याद्री सर्व अँन्ड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली. दरम्यान कातकरी समाजातील तरुणांने तीन मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. अतिशय भयान अशा या घटनेमुळे भोर व नसरापूर हादरून गेले आहे. यापुर्वी भाटघर धरणात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेमुळे त्या अपघाताच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या.

इतर बातम्या