Breaking news

Chinchwad Bypoll Election Result : चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विजयी; नाना काटेंना बंडखोरीचा फटका

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रातील बहुचर्चित चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला. यामध्ये भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप ह्या 36,770 मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका बसला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे सदर जागेसाठी ही पोटनिवडणुक घेण्यात आली होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अश्विनी जगताप यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. ती शेवटच्या फेरीपर्यत कायम राहिली. भाजपाच्या अश्विनी जगताप यांना 1,35,494 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 99,424 मते मिळाली. अपक्ष राहुल कलाटे यांना 40075 मते मिळाली. नाना काटे व राहुल कलाटे यांची मते विचार घेतली तर ती जगताप यांच्यापेक्षा जास्त होतात.    

      महाविकास आघाडीकडून सुरुवातीला राहुल कलाटे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली होती मात्र ऐनवेळी कलाटे य‍ांची उमदवारी कापत ती नाना काटे य‍ांना देण्यात आली. यामुळे नाराजा झालेल्या कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने मते नाना काटे व राहुल कलाटे यांच्यात विभागली गेली तसेच मतांचा टक्का देखील घसरल्याने भाजपाच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या. निकालानंतर भाजपा कार्यकर्ते व जगताप समर्थकांनी जल्लोष केला. अश्विनी जगताप यांनी हा विजय मतदार व लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित केला. लक्ष्मण भाऊंनी केलेली कामे व मी काही करु शकेल हा मतदारांचा विश्वास यामधून दिसून येत असून त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे जगताप यांनी सांगितले. दरम्यान ही निवडणूक भाजपा व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते, विरोधीपक्ष नेते असे दिग्गज प्रचारात सहभागी झाले होते.

इतर बातम्या