Breaking news

Lonavala Breaking News : लोणावळ्यात सोमवारी दोन ठिकाणी धूम स्टाईलने चोरी; दुचाकीवरुन येऊन पळविले महिलांचे दागिणे

लोणावळा : लोणावळ्यात सोमवारी दुपारी 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास खंडाळा व वलवण भागात धुम स्टाईलने चोरीचे प्रकार घडले आहेत. दोन्ही ठिकाणी दुचाकी गाडीवरुन आलेल्या अनोळखी इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेले आहेत.

    पहिल्या घटनेत सुशिला बाळू भगत (वय 60 वर्ष, रा. वलवण लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वलवण गावचे हद्दीत हिंदुस्थान हार्डवेअरच्या पुढे गेलेनंतर उजवे बाजुला असणार्‍या रस्त्यावरून भगत ह्या जात असताना समोरुन अचानक दोन अनोळखी इसम काळे रंगाचे मोटारसायकलवर येवून फिर्यादी चे गळयातील 02 तोळे 06 गॅम वजनाचे (95,000/-) सोन्याची दोन पदरी माळ हिसकावून चोरी करुन पळाले. तर दुसरी घटना ही खंडाळा बॅटरी हिल परिसरात घडली. ड्युक्स हाॅटेल समोर पेरु विकणार्‍या सविता रविंद्र पोशिरे (वय 24 वर्ष, रा बॅटरीहिल खंडाळा) ह्याच्या जवळ दुचाकी गाडीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्याच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचा मिनी गठण (90,000/-) जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेहला. एकाच दिवशी भर दिवसा चोरीच्या या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोवार व पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत. दरम्यान दोन्ही घटनांच्या परिसरातील तसेच हायवेवरील सिसीटिव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरु आहे.

इतर बातम्या