आनंदवार्ता l विश्व साहित्यरत्न हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राष्ट्रीय हिंदुरत्न पुरस्कार प्रदान
मावळ माझा न्युज नेटवर्क : विश्व साहित्यरत्न हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना नुकताच राष्ट्रीय हिंदू रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार 2024 हा पुरस्कार, मनिभाई मानव सेवा ट्रस्ट दिल्ली संचलित पुणे नॅशनल iso 9001 मानांकीत या मानवतावादी सेवाभावी संस्थे द्वारा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पुणे येथे हिंदुरत्न डॉ. रवींद्रजीं भोळे यांचे शुभ हस्ते श्री. हिंगणकर महाराज यांना देण्यात आला. हा पुरस्कार सकल हिंदूरत्न मानवतावादी सेवकांला दिला जातो. हिंदुरत्न हा पुरस्कार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे नावे देण्यात आला आहे. त्या वेळी मंचावर आमदार महेशदादा लांडगे, मोहिते पाटील, हभप मधुकर महाराज जाधव कराडकर, डॉ विजय ढोरे, डॉ खर्चे, किरण पाटील रोडे, स्वप्नील जाधव, प्रा. अंजली सोनवने आणि हिंगणकर परिवारासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.