Breaking news

Lonavala News : महिलांच्या सन्मानासाठी भाजपाच्या त्या दोन महिला आमदारांनी केला एसटीने प्रवास

लोणावळा : महाराष्ट्र शासनाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधक महिलांच्या सन्मानासाठी एसटी प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासोबत महिला सन्मानासाठी भाजपाच्या पिंपरी चिंचवड येथील महिला आमदार उमाताई खापरे व अश्विनी जगताप यांनी माजी महापौर व माजी महिला नगरसेविका यांच्यासोबत पिंपरी ते लोणावळा असा एसटीने प्रवास करत महिलांनी शासनाने दिलेल्या या सवलतीचा लाभ घ्यावा असा संदेश दिला.

    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शैला मोळक, शोभा भर्‍हाडे, शारदा सोनवणे, सरिता खुळे, निताताई पाडाळे, सुप्रियाताई चांदगुडे, दिपाली धानुकर, राधिका बोर्लीकर, रेखा कडाले, स्थायी समितीच्या माजी चेअरमन ममता गायकवाड, ज्योती जाधव, शोभा भेगडे, रजनी ठाकूर आदी महिलांनी हा प्रवास केला. लोणावळा बस स्थानकावर माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, पार्वती रावळ, लक्ष्मी बडेला, सुनिल तावरे, हर्षल होगले, नंदकुमार जोशी व भाजपा महिला आघाडी लोणावळा यांनी त्यांचे स्वागत केले.

    यावेळी बोलताना आमदार उमा खापरे व आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने महिलांच्या सन्मानासाठी संपुर्ण महाराष्ट्रात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. यामुळे महिला आता एसटी बस मधून राज्यभरात कोठेही 50 टक्के सवलतीचा लाभ घेत प्रवास करु शकणार आहेत. मात्र याबाबत महिलांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शासनाकडून एसटी बसेस मध्ये सुधारणा केली जात आहे. बस स्थानकांची काही प्रमाणात दुरावस्था असून तो सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या