Breaking news

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती उपक्रम

लोणावळा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेना व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. बुधवारी (5 जून) झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सुमारे 50 झाडांचे रोपण केले आणि वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.

      कार्यक्रमाची सुरुवात एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासाठी खड्डे खणून केली. त्यानंतर राष्ट्रीय हरित सेनेच्या सदस्यांनी परिसराची स्वच्छता केली आणि झाडांसाठी पाण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे झाडांची रोपे नियोजित स्थळी नेऊन कुडाळ, फावडे यांसारख्या साहित्याच्या साहाय्याने वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीनिशी हा उपक्रम उत्साहात पार पाडला.

       या उपक्रमाआधी झालेल्या प्रार्थना सभेत शाळेचे प्राचार्य एन. के. मिश्रा यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम आणि नेतृत्व करणाऱ्या देशाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पर्यावरण रक्षणाची गरज आणि जबाबदारी यावर त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक प्रा. एम. एन. नवले, संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. सौ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष (प्रशासन) सौ. रचना नवले-अष्टेकर आणि उपाध्यक्ष (एच.आर.) डॉ. श्री. रोहित एम. नवले यांची उपस्थिती लाभली. त्यांनी शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत "फक्त झाडे लावा नाही, ती जपा आणि वाढवा" असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राचार्य एन. के. मिश्रा यांनी विशेष आभार मानले. तसेच अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव रुजविण्याचे कार्य पुढेही सातत्याने करत राहू, असे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या