Breaking news

Sinhagad Express : तब्बल दिड वर्षाने सुरु झालेल्या सिंहगड एक्सप्रेसचे प्रवाश्यांकडून जल्लोशात स्वागत

पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे तब्बल दिड वर्ष बंद राहिलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत रुजु झाली. या सिंहगड एक्सप्रेसचे आज चिंचवड रेल्वे स्थानकावर जल्लोशात स्वागत करण्यात आले. 

    मुंबई पुणे प्रवासासाठी चाकरमण्यांची जिव्हाळ्याची असलेली सिंहगड एक्सप्रेस सुरु व्हावी ही मागील अनेक दिवसांपासून प्रवासी व प्रवासी संघटनेची मागणी होती. पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेने सदरची गाडी सुरु करण्यासाठी मोठा पाठपुरावा केला होता अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिली. आज या गाडीचे प्रवाश्यांनी पुजन करत जल्लोष करत एकमेकांना पेढे भरविण्यात आले. मोटारमन व गार्डचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या