Maval Maza News l मोतीबाग, रेशीमबाग प्रमाणेच पिंपरी चिंचवड येथे संघाचे मुख्यालय व्हावे – सचिन चपळगावकर
पिंपरी चिंचवड : मोतीबाग रेशीमबाग प्रमाणेच पिंपरी चिंचवड येथे संघाचे मुख्यालय व्हावे अशी भावना ज्येष्ठ पत्रकार सचिन चपळगावकर यांनी व्यक्त केले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून संचलनाचे आयोजन दसऱ्याच्या दिवशी करण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध असे हे संचलन पार पडले. मोतीबाग व रेशीम बाग मुख्यालय हे स्वयंसेवकांसाठी एक प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्याचप्रमाणे एक मुख्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाल्यास निश्चितच त्याचा फायदा या सर्व परिसरातील नागरिकांसाठी होईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे. हिंदू धर्म व संस्कृती रक्षणासाठी संघ संपूर्ण देशभरामध्ये कार्यरत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपले स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला एकसंघ करण्यासाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली विजयादशमीच्या विजयी मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यंदाचे हे स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्त देशभरात सर्वत्र संघाचे संचलन मोठ्या थाटामाटा मध्ये व समाजाला ऊर्जा व स्फूर्ती देत संपन्न झाले.





















