Breaking news

वाकसई चाळीजवळ क्रेन व ट्रेलरचा भिषण अपघात; सुदैवाने जिवितहानी टळली

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरसोली टोल नाक्याजवळील वाकसई चाळीजवळ आज रात्री क्रेन व ट्रेलर यांच्यात भिषण अपघात झाला. या अपघातात क्रेन व ट्रेलर वरील रिकामा कंटेनर पलटी झाला. यावेळी एक दुचाकीस्वार सुदैवाने बचावला तसेच दोन्ही वाहनांचे चालक बचावले आहेत.

    सदरची घटना घडली हा सर्व नागरी वस्तीचा भाग आहे. सुदैवाने ही घटना नागरी वस्तीच्या भागात घडली असती तर मोठी हानी झाली असती. अपघाताचा भिषण आवाज आल्याने वाकसई चाळ परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पाऊस पडत असताना देखील तरुणांनी व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला काढत बंद झालेली वाहतूक पुन्हा सुरू केली. रात्री साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झाला.

इतर बातम्या