एमपीएससी परीक्षेतील यशा बद्दल सुरज भोसले यांचा सत्कार

आळंदी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी कर व महसूल विभागात सहाय्यक पदी निवड झाल्या बद्दल सूरज भोसले यांचा सक्षम फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सक्षम फाऊंडेशनचे पदाधिकारी, सभासद मनोज पवार, निलेश वाबळे, विनय पोपळकर, अनिकेत डफळ, कृष्णा देशमुख, श्रीपाद सुर्वे, कौशिक बोरुंदिया, शुभम देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.