मराठा आरक्षण मागणीसाठी इंद्रायणी नदीत जल आंदोलन; मनोज जरांगे पाटील यांचे भूमिकेचे आळंदीत समर्थन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे तसेच जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसह मराठा आंदोलकांवर शासनाने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासह केलेल्या इतर मागण्यांना जाहीर पाठिंबा देत मराठा आरक्षण मागणीस सकल मराठा समाज आळंदी पंचक्रोशी यांचे वतीने आळंदीतील इंद्रायणी नदीत उतरून जल आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देत मराठा समाजाचे सर्व मागण्या मान्य करून तात्काळ मराठा आरक्षण मागणी मान्य करावी अशी मागणी करीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र राहील असा खणखणीत इशारा माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी शासनास दिला आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, शिवसेनेचे नेते उत्तमराव गोगावले, अर्जुन कुरे, श्रीकांत काकडे, आनंदराव मुंगसे, शशिकांतराजे जाधव यांचेसह मराठा समाज बांधव उपिस्थत होते.
गेल्या नऊ दिवसांपासून मराठा सेवक संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु होते. त्यांच्या उपोषण आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आळंदीत इंद्रायणी नदी उतरून जल आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाचे मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. समाजाला आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश कायद्यात रूपांतरण तसेच मराठा समाजाचे कार्यकर्ते यांचेवर दाखल गुन्हे मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील उपोषण करत असुन त्यांचे अनेक आंदोलने झाली तरी शासनास जाग येत नसल्याने आळंदीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यापुढील काळात मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी समाज बांधवांचे वतीने माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत जोरदार घोषणा देत मराठा समाजास आरक्षण देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. आंदोलन स्थळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आळंदी नगरपरिषद आस्थापना विभाग प्रमुख विष्णुकुमार शिवशरण, अग्निशमन विभाग, महसूल विभाग कर्मचारी अधिकारी यांनी चोख नियोजन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जोरदार घोषणा देत शांततेत आंदोलन पार पडले.