Breaking news

मोठी बातमी । शिंदे गटाच्या तळेगाव शहरप्रमुखांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

लोणावळा : शिंदे गटाचे तळेगाव शहराचे‌ विद्यमान शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे व तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शंकर भेगडे यांनी आज सहकार्यां समवेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर व शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहर शिवसेना‌ भवन येथे पक्षप्रवेश केला.

       या‌ पक्षप्रवेश कार्यक्रमास मावळ उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड सचिन भोसले, महिला आघाडी मावळ लोकसभा संपर्क संघटीका लतिकाताई पाष्टे, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, रोमी संधु आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या