Breaking news

सत्यसाई कार्तिक इज बॅक l नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर गुन्हे दाखल

लोणावळा : मागील दोन तीन महिने प्रशिक्षणासाठी गेलेले आयपीएस सत्यसाई कार्तिक पुन्हा रुजू झाले आहे. रुजू होताच त्यांनी मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करत त्यांच्या चालकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

       लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी 10 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलीस पथकासह टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई. ची विक्री करताना तसेच वाद्य, ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळुन आल्याने नमूद दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहिता चे कलम 223 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 33 (डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करत आहेत.  

     सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह केली आहे.

इतर बातम्या