संतदास उर्फ पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना संत ज्ञानेश्वर साहित्य रत्न पुरस्कार 2025 प्रदान

मावळ माझा न्युज नेटवर्क : संतदास उर्फ पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार 2025 देऊन नुकतेच गौरविण्यात आले. काव्य निनाद या साहित्य संस्थेद्वारा आयोजित साहित्य संमेलनात आळंदी येथे संमेलनाध्यक्ष प्रकाश पाठक यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संतदास उपाख्य पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या साहित्य सेवेची दखल घेऊन यांना संत ज्ञानेश्वर साहित्य रत्न पुरस्कार 2025 देण्यात आला. हिंगणकर महाराज यांचे अभंग निर्झर भाग 1, अभंग निर्झर भाग 2, वासुदेव पासष्टी, व ऑनलाईन 120 पुस्तके नी अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे द्वारा इतर साहित्यकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कोरोनाकाळा पासून अविरत सुरू आहे. त्यांनी या साहित्य सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. आता पर्यंत जवळ जवळ बरेच विपुल प्रमाणात अभंग व इतरही काव्य लेखन केलेले आहे. तसेच सामाजिक कार्य स्वच्छता अभियान कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत.
पर्यवरण सेवा झाडे लावून करीत आहेत. आज पर्यंत त्यांना 16 पुरस्कार मिळाले आहेत व इतर सन्मानही आहेत. अनेक साहित्य संमेलने त्यांच्या अध्यक्षतेखाली / प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली आहेत. हिंगणकर महाराज हिंदी, संस्कृत व मराठी मध्ये काव्य लेखन करतात. पुरस्कार प्रदान करताना याप्रसंगी मंचावर संमेलन उदघाटक अनुराधा बेके, काव्य निनाद संस्थेचे अध्यक्ष विकास पालवे, संमेलनाचे उदघाटक अनुराधा बेके, प्रमुख अतिथी नीता भामरे, विनिता कदम, ॲड. उमाकांत आदमाने, माधव गुरव, जेष्ठ कवी वासुदेव सोनटक्के, रेखाताई मालपुरे, वानखेडे, विठ्ठल शिंदे, अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे, डॉ सुनील वाघमारे आदी मान्यवर तसेच कवी, कवयित्री उपस्थित होते.