Breaking news

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी | पुणे लोणावळा लोहमार्गावर आज रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक; लोकलच्या 14 फेऱ्या रद्द

लोणावळा : पुणे-लोणावळा मार्गावर Engineering and Technical अभियांत्रिकी आणि तांत्रिक कामांकरिता आज रविवारी (दि. 21) रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांच्या 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (गाडी क्र. 12164) साडेतीन तास उशिराने धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक दर रविवारी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. सुट्टीच्या कामाचे नियोजन करून अनेक नागरिक पुणे पिंपरी भागात खरेदीसाठी जाण्याचे नियोजन करतात. मात्र याच दिवशी लोकल गाड्या बंद रहात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

पुण्याहून लोणावळ्यास जाणाऱ्या रद्द गाड्या

■ पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 09.57, 11.17, दुपारी 03.00 आणि सायंकाळी 04.25, 06.02 वाजता सुटणारी लोकल.

■ शिवाजीनगरहून तळेगावकरिता दुपारी 03.47 व 05.20 वाजता सुटणारी लोकल.

लोणावळ्याहून पुण्यास जाणाऱ्या रद्द गाड्या

■ लोणावळ्याहून शिवाजीनगरकडे सकाळी 10.05, सायंकाळी 05.30, 06.08, 07.35 वाजता सुटणारी लोकल.

लोणावळ्याहून पुणेसाठी पुणे दुपारी 02.50, सायंकाळी 07.00 वाजता सुटणारी लोकल.

■ तळेगाव येथून पुणेसाठी सायंकाळी 04.40 वाजता सुटणारी लोकल.

इतर बातम्या