Lonavala News : लोणावळ्यात RTO कार्यालयाकडून पक्क्या लायसन्ससाठी 22 फेब्रुवारी रोजी शिबिराचे आयोजन

लोणावळा : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वतीने लोणावळा शहरात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी (लायसन्स) 22 फेब्रुवारी रोजी शिबिर दौरा होणार आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या तुंगार्ली येथी स्वा. सावरकर शाळेच्या परिसरात हे शिबिर होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी अपाँईटमेंट घेतलेल्या वेळेत हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
2017 सालापर्यंत लोणावळा शहरात RTO कार्यालयाकडून दरमहा असे शिबिर घेत वाहन चालविण्याची ट्रायल घेऊन वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येत होता. मात्र मागील पाच वर्षात सदर शिबिर बंद झाले होते. आता 22 फेब्रुवारी रोजी पक्क्या लायसन्स साठी सदरचे शिबिर होणार असल्याने लोणावळा व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या शिबिराखेरीज वाहनांची फिटनेस तपासणी व पासिंग, नियमित लायसन्स चाचणी देखील लोणावळ्यात घेण्यात यावी जेणेकरून लोणावळा व परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळेल अशी मागणी नागरिकांनी केली आहे.