Breaking news

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या 176 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; 92 हजार दंड वसूल

लोणावळा : कोरोना नियम व पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळा ग्रामीण परिसरातील पर्यटनस्थळावर आलेल्या 176 पर्यटकांवर आज शनिवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून 92 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.

     पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण रोखण्यासाठी प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात असताना, पर्यटनस्थळांवर गर्दी होत असल्याने मागील महिन्यात जिल्हाधिकारी पुणे यांनी पर्यटनस्थळ बंदी लागू केली आहे. असे असले तरी अनेक पर्यटक या आदेशाचे व कोरोना नियमांचे उल्लंघन करत पर्यटनस्थळांवर जातात. अनेक पर्यटकांच्या चेहर्‍यावर मास्क देखील नसतो तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जागोजागी चेकपोस्ट लावत अशा पर्यटकांवर कारवाई केली जात आहे. मागील वर्षभरात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुमारे 1500 हून अधिक जणांवर कोरोना नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करत 10 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. 

    पर्यटकांनी कोरोनाचे नियमांचे व पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी केले आहे.

इतर बातम्या