Breaking news

Pune News : इंदापूर येथे शिकाऊ विमान पडले; महिला पायलट जखमी

पुणे : कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत आज सकाळी 11.30 वाजता कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड (वय 22 वर्ष रा. पुणे) किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

     कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले. कु. भविका राठोड या सदर अपघातात किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.

इतर बातम्या