Breaking news

ओझोन थराचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे - डॉ. निलेश काळे

आपण सर्व जमिनीवर राहत असलेल्या सर्व प्राण्यांना आज जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे परंतु ऑक्सिजन इतकेच अतिशय महत्त्वाची एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वांना जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, ती म्हणजे ओझोन वायू या ओझोन वायूचे रक्षण करणे यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागाकडून 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो.    

      सर्वात प्रथम हा दिवस 1994 मध्ये  साजरा केला गेला होता. या दिवसानंतर आज पर्यंत हा दिवस दर वर्षी 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिवस साजरा करण्यात येतो. ओझन म्हणजे काय तर ओझोन हा पृथ्वीवर वेगवेगळ्या वायुमंडळातील एक थर आहे. ओझोन थर हा सूर्याच्या सूर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याचे काम करतो. कारण सूर्यापासून निघालेले सूर्यकिरण हे इतके घातक असतात की ते जर आपल्या शरीरावर पडले तर आपल्याला कर्करोग देखील होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यावर एक किरण पडल्यावर मोतीबिंदू सुद्धा होऊ शकतो आणि हेच जर किरण पिकावर पडले तर पिकांची रोगराईमुळे नासाडी होते. त्यामुळे ओझोन वायू हा सूर्यापासून निघत असलेल्या किरणांना एकमेकांपासून वेगळे करतो. जेणेकरून त्याचा प्रभाव होईल, जेणेकरून आपल्याला त्यांच्यापासून काही हानी पोहोचत नसते. जर ही सूर्यापासून निघालेली सूक्ष्म अतिनील किरणे पृथ्वीवर आली तर अचानक तापमानात वाढ होते. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, पूर निर्माण होतो, वादळे निर्माण होतात, भूकंप होतो. या सर्वांपासून सुरक्षित राहायचे असेल तर किंवा सुरक्षित राहण्यासाठी ओझोन थराचे रक्षण करणे फार गरजेचे आहे. कारण ओझन थर आपला या  सर्वांपासून बचाव करतो. परंतु काही कारणांमुळे हा ओझोन थर नष्ट होऊ लागला आहे. आज पृथ्वीवर सजीवांचे रक्षण हे ओझोन मुळेच होते.

रासायनिक संयुगे ही ओझोन वायूचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत आहेत. ज्यामध्ये नायट्रस ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन यासारख्या वायूंचा समावेश होतो तर ओझोन थर वाचवण्यासाठी काही उपाययोजना करणे देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मानवाने वातानुकूलित यंत्रे तसेच शीत कपाटामध्ये हवा थंड करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टॅक्सटॉक्साईड वायू वापरले जात असतात. हे वायू हवेमध्ये जेव्हा मिसळतात तेव्हा हे ओझोन थराला नष्ट करण्याचे काम करतात.  म्हणून घरगुती वापरात क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा कार्बन टॅक्सटॉक्साईड वापर करणे टाळावे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. तसेच जंगलांचे रक्षण करणे आणि शेतीचे क्षेत्र कमी होणार नाही याकडे देखील सद्यस्थितीला लक्ष देणे फार गरजेचे आहे. वाढती सिमेंटची जंगले म्हणजेच वाढणाऱ्या वसाहती यावर नियंत्रण राखणे अत्यंत गरजेचे आहे. एकूणच पर्यावरण संवर्धन करणे याकडे सद्यस्थितीला लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  


डाॅ. निलेश काळे

लेखक टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे येथील भूगोल विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहे.

इतर बातम्या