प्रेरणा विद्यालयाचा एलिमेंटरी ड्रॉईग ग्रेड परिक्षेचा निकाल 97 टक्के

आकुर्डी : महाराष्ट्र शासन रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी ड्राॅईग ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयाचा निकाल 97% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण 74 विद्यार्थी बसले होते. कु.अंकिता पाटील, ईश्वरी गायकवाड, वरूण महाजन, संस्कार नेतकर, स्वाती पुजारी, योगेश कांबळे यांना A ग्रेड मिळाली. तर लोकेश पाटील, समिक्षा टिळेकर, योगिराज गायकवाड, स्नेहा बडगुजर, नंदिनी फुलारी, अमृता हुंबे, श्रद्धा पाटील या विद्यार्थ्यांना B ग्रेड मिळाली आहे . या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंदजी संचेती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता जाधव, प्राचार्या मिनाक्षी दासरी, प्रशा. सल्लागार श्रीमती शुभांगी इथापे यांनी कलाशिक्षक विशाल केदारी यांच्यासह विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.