Breaking news

Lonavala News l लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पाच पानटपऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; पावडर व इतर साहित्य जप्त

लोणावळा : लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पान टपऱ्यांवर पोलिसांनी आज धडक कारवाई करत पाच टपऱ्यावरून पोलिसांनी गुटखा युक्त पावडर व इतर पानात मिक्स करायचे साहित्य जप्त केले असल्याची माहिती लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

      चैतन्य पान शॉप रायवूड, नरेश पान शॉप लोणावळा, साईरतन पान शॉप, महालक्ष्मी पान शॉप पांगोळी, पैलवान पान शॉप, औंढे या पाच पान शॉप वर सदर कारवाई करण्यात आली आहे. 

      आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त वर्ग माहिती मिळाली होती की पान शॉप मधून गांजा, एमडी पावडर याची पानांमध्ये मिसळून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आपापल्या हाती मधील टपऱ्यांवर कारवाई करत त्यामधून विकली जाणारी पावडर व पानामध्ये मिक्स करणारे इतर साहित्य जप्त केले आहे. सदरचे जप्त केलेले साहित्य अन्न प्रशासन पुणे यांच्याकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आयपीएस कार्तिक यांनी सांगितले. तसेच पान टपऱ्यांमधून 18 वर्षाखालील मुलांना गुटखा व पान मसाला विक्री केली जाणार नाही अशा स्वरूपाचे फलक लावण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. सोबतच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत देखील सूचित करण्यात आले आहे. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देखील शाळा महाविद्यालयाच्या परिसरात 100 मीटर अंतरावर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  

      सदरच्या कारवाया आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थितीमध्ये लोणावळा शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार, पवन कराड यांच्या पथकाने केली आहे.

इतर बातम्या