Breaking news

Pawna Dam : चिंता मिटली; पवना धरण 70 टक्के भरले

लोणावळा : मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवन मावळातील पवना धरण 70.43 टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मागील तीन दिवसांपासून मावळात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मागील पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे अद्याप डोंगर भागातून पाणी वहात आहे. ते पाणी विविध ठिकाणांहून धरणाच्या जलायशयात येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरु आहे. मावळातील आंद्रा धरण 100 टक्के भरले आहे. तर वडिवळे धरणात 81.28 टक्के पाणीसाठा झाला आहे. कासारसाई धरणात देखील 87.05 टक्के पाणीसाठा झाला असल्याने तालुक्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे.

इतर बातम्या

School Van : स्कूल बस मालक व चालकांसाठी महत्वाची बातमी; स्कूल बसेस व व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार व रविवारीही कामकाज सुरु राहणार