Breaking news

Maval Crime News : कान्हे रेल्वे स्टेशन जवळ दगडाने मारहाण करून एकाचा खून

मावळ माझा न्युज : कान्हे रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळाच्या उत्तरेला असलेल्या झुडपात व गवतात एका 54 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगडाने मारहाण करत खून करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी 11 वाजण्याच्या पुर्वी घडला आहे. याप्रकरणी मयत व्यक्तीचा मुलगा ओमकार भागुजी काटकर (वय 19, रा. पारवाडी, मावळ) याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     भागुजी बाबुराव काटकर (वय 54, रा. पारवाडी, ता. मावळ) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते कान्हे फाटा येथील महिंद्रा कंपनीत कामाला आहेत. काल रात्री ते कामाला गेले होते. आज सकाळी अकरा वाजण्यापुर्वी हा खून करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या चेहर्‍यावर डाव्या डोळ्याच्यावर दगडाने मारहाण करण्यात आली आहे. तसेच चेहर्‍यावर काळे निळे वळ ऊठलेले आहेत. हा खून कोणी व कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक व वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विलास भोसले पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या