Expressway Accident l मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पो अपघातात एकाचा मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 1 सप्टेंबर रोजी पहाटे 2.35 वाजण्याच्या सुमारास झालेल्या टेम्पो अपघातात एकाचा मृत्यू झाला. किमी 37/200 जवळ मुंबई लेनवर हा अपघात झाला.
बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो क्रमांक (KA 25 AB 4212) वरील चालक संतोष पटकन शेटटी (वय 27 वर्ष रा. धारवाड कर्नाटक) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो हा मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना त्याचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने सदरचा टेम्पो पुढे जाणारा ट्रक क्रमांक (MH-10-DT-5199) यास पाठीमागून जोरात धडकला. या अपघातात क्लिनर बाजू कडील टेम्पोची केबीन चेंबल्याने क्लिनर गुरूसिददा (वय अंदाजे 25 पुर्ण नाव पत्ता मिळून आला नाही) यास गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने आयआरबी कडील हायड्रा व देवदूत टिम चे सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.