Breaking news

Omicron News : पिंपरी चिंचवड मध्ये ओमायक्राॅनचे 6 रुग्ण सापडले तर पुण्यात एकाला लागण

पिंपरी चिंचवड : डोंबिवली मध्ये काल ओमायक्राॅनचा एक रुग्ण सापडल्यानंतर आज पिंपरी चिंचवड शहरात 6 जणांना ओमायक्राॅनची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पुण्यात देखील एकाला लागण झाल्याने महाराष्ट्रातील ओमायक्राॅन रुग्णांची संख्या 8 झाली आहे.

     नायजेरिया देशातील लेगाॅस शहरातून पिंपरी चिंचवड मध्ये भावाला भेटायला आलेल्या एका महिलेसह तीच्या दोन मुली, भाऊ व भावाच्या दोन मुली अशा जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता त्यांच्या शरिरात ओमायक्राॅनचे विषाणू सापडले असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला आहे. तसेच पुण्यातील एका 47 वर्षीय नागरिकांच्या अहवालात देखील या नविन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. तो फिनलंड येथे जाऊन आला होता. त्याला सौम्य ताप असून प्रकृती स्थिर आहे.

    पिंपरी चिंचवड मधील रुग्णांपैकी महिलेला सौम्य तापाची लक्षणे असून अन्य कोणाला फार लक्षणे नाहीत. त याच्यावर जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

इतर बातम्या