Breaking news

आनंदवार्ता । भारतीय डाक विभागाच्या वतीने लोणावळा पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

लोणावळा : भारतीय डाक विभागाच्या (पुणे ग्रामीण) वतीने पुणे येथे वार्षिक पारितोषिक समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यामध्ये लोणावळा पोस्टातील विवेक थोरवे यांना उत्कृष्ट कामगिरी म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच गणेश वडुरकर (ASP west Div) यांना सर्वात जास्त खाती खोलल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळाला. भारत व्ही गवळी (पोस्टमास्तर लोणावळा यांना फिलीटेली अकांउट), सुवर्णा जे खोपडे (लोणावळा यांना नविन खाती खोलणे संदर्भात), सुनिल गरुड (पोस्टमास्तर RPTS पोस्ट यांना लाईफ इन्शुरन्स संदर्भात), बाळासाहेब लगड (लोणावळा यांना इन्शुरन्स संदर्भात), संजय मराठे (तळेगाव दाभाडे यांना नविन खाते खोलणे संदर्भात), महेश टकले (देहुरोड यांना आधार अपडेट संदर्भात) अशी विविध पारितोषिके आर.के. जायभाये (IPOS पोस्ट मास्तर जनरल पुणे) व बी.पी. एरंडे (अधिक्षक पुणे ग्रामीण विभाग) यांच्या शुभ हस्ते वितरीत करण्यात आली. यावेळी पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पोस्ट विभागाचे कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.

इतर बातम्या