Breaking news

घोराडेश्वराच्या डोंगरावर महिलेचा गळा आवळून खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

देहूरोड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वराच्या डोंगरावर एका तरूणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मिताली सोमनाथ धडस (वय 20 वर्षे, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मिताली धडस रविवार पासून बेपत्ता होती. तिच्या पतीने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी पोलिसांत धाव घेतली आणि मितालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, बेपत्ता मितालीचा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेहच घोरावडेश्वर डोंगराच्या वरच्या बाजूस आढळून आला. सदर तरुणीचा आधी ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला व नंतर चेहरा विद्रूप करण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

   अटक करण्यात आलेल्या तरुणाकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असली तरी अद्याप खुनाचे नक्की कारण समजू शकले नाही.

इतर बातम्या