Breaking news

Lonavala Crime News : स्थानिक गुन्हे शाखेची लोणावळ्यात धडाकेबाज कामगिरी; सराईत मोबाईल चोर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने लोणावळा शहरांमध्ये एक धडाकेबाज कामगिरी करत सराईत मोबाईल चोराला जेरबंद केले आहे त्याच्याकडून चोरी केलेले मोबाईल संच देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

      पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येत असतात यावेळी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोऱ्या केल्या जातात लोणावळा शहरांमध्ये घडलेल्या काही मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत होते. हा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर व तांत्रिक तपासानंतर त्यांनी

सापळा रचून आकाश भरत धोत्रे (वय 21 वर्षे रा ओळकाईवाडी, कुसगाव, लोणावळा) यास ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवून चौकशी केली असता लोणावळा भागात मोबाईल चोरी करत असल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. चौकशीत आणखी मोबाईल चोरीची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास लोणावळा शहर करत आहे.

       सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक  सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहायक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार राजु मोमीन, अतुल डेरे, प्राण येवले, सहा फौजदार कदम, संदीप मानकर, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक मुलाणी यांचे पथकाने केली.

इतर बातम्या