Breaking news

Maval Murder Case : कोथुर्णे अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या - उमा खापरे

लोणावळा : कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी अपहरण व हत्या प्रकरणातील नराधाम आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. कोथुर्णे गावातील सात वर्षी मुलीचे दोन दिवसापुर्वी अपहरण झाले होते. काल तीचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे मिळून आला होता. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र या घटनेची संतप्त प्रतिक्रिया मावळात उमटली असून आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आज पवनानगर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे मावळ तालुका हादरला असून संतांच्या भुमीत असे कृत्य करणार्‍या आरोपीला फाशीची मागणी करण्यात आली. आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांनी संताप व्यक्त केला.

इतर बातम्या