Breaking news

LONAVALA PMPML BUS : लोणावळा निगडी बस सेवेचा उद्यापासून शुभारंभ

लोणावळा : लोणावळा शहरातील नागरिकांच्या प्रवास सेवेसाठी लोणावळा निगडी या PMPML बस सेवेचा शुभारंभ उद्या शुक्रवारी (29 आँक्टोबर) सकाळी अकरा वाजता निगडी येथे होणार असून दुपारी बारा वाजता रेल्वे दवाखाना चौकात या बसचे स्वागत करण्यात येणार आहे.

    कामशेत शहरापर्यत सुरु असलेली PMPML सेवा लोणावळा शहरापर्यत सुरु करण्याची मागणी लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली होती. तसेच ही बससेवा सुरु करण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. निगडी चौकात आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे व मुरलीधर मोहोळ,परिवहन समितीच्या उपाध्यक्षा जोत्सना एकबोटे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता बससेचेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर लोणावळा येथील शांती चौकात नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपा गटनेते देविदास कडू आदींच्या उपस्थितीमध्ये बसचे लोणावळा शहरात स्वागत करण्यात येणार आहे. 

    सदरच्या बससेवेमुळे कामशेत, तळेगाव, निगडी भागात महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच नागरिक यांना मोठा फायदा होणार आहे.

इतर बातम्या