Breaking news

Lonavala Crime News : मोबाईल चोर लोणावळा शहर पोलिसांच्या सापळ्यात

लोणावळा : पर्यटकाच्या खिश्यातील मोबाईल चोरणारे दोन चोरटे लोणावळा शहर पोलिसांच्या सापळ्यात सापडले आहेत. कुमार चौकातील पुरोहित चिक्की दुकानासमोर ही घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी तहिर हुसेनअजिज मोहमंद दुर्वेश (वय 34, रा. गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोसीन इब्राहिम खान (वय 26, रा. भिवंडी, ठाणे), ईरशान अब्दुल रौफ अन्सारी (वय 30, भिवंडी ठाणे) यांना ताब्यात घेत अटक केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. शनिवारी (6 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींना पोलिसांनी रात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. सदर आरोपी यांनी यापुर्वी असे काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

इतर बातम्या