लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळातर्फे ५० झाडांचे वृक्षारोपण
लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाच्या वतीने शिक्षक सोसायटी, नांगरगाव येथे ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम क्लबचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी वृक्षारोपणासाठी उपस्थित असलेल्या सर्व लायन्स सदस्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना “एक झाड लावा, एक जीवन वाचवा आणि भविष्यातील पिढी सुरक्षित करा” असा मोलाचा संदेश दिला. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या वृक्षारोपण उपक्रमासाठी ॲक्टिव्हिटी चेअरमन लायन मनोज लुंकड, खजिनदार लायन राजेश राजपूत, लायन प्रकाश जैन, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन विरल गाला, लायन कांता ओसवाल, लायन अश्विनी कदम,लायन दिप्ती लुणावत, लायन रणजू लुणावत, लायन स्नेहलता माळी, लायन हेमा राजपूत तसेच रमेशभाऊ दळवी, अक्षय केदारी, अनुजा दळवी आदी उपस्थित होते.

















