लायन्स क्लबच्या आरोग्य तपासणी शिबिरात ७४ नागरिकांची तपासणी
लोणावळा : कैवल्यधाम लोणावळा, लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा, मनशक्ती केंद्र लोणावळा, खंडेलवाल मेडिकल आणि मायमर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कैवल्यधाम लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेले मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात एकूण ७४ नागरिकांची विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात नागरिकांच्या विविध आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन तसेच पुढील उपचार व काळजी घेण्यासंदर्भात वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
या शिबिरासाठी लायन्स क्लबच्या वतीने लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन डॉ. ऋतुजा तांडेल, डॉ. दिलीप सुराणा, खजिनदार रोहित थोरात, लायन अश्विनी कदम, लायन चार्मी पारेख, लायन कांता ओसवाल, लायन कैलास माळी, लायन मनोज लुंकड, ॲड. प्रफुल्ल लुंकड, लायन स्नेहलता माळी, लायन अभय जैन, लायन हेमा राजपूत आणि लायन राजाजी खंडेलवाल उपस्थित होते.
मनशक्ती केंद्राचे डॉ. गोसावी, डॉ. निकाळजे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही शिबिरात सहभाग घेतला. मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. पूनम पुणवटकर व त्यांच्या डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. तसेच कैवल्यधामच्या डॉ. नीना वर्मा आणि रागिणी गुप्ता यांनीही या सामाजिक उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबच्या वतीने मनशक्ती केंद्र, खंडेलवाल मेडिकल, मायमर वैद्यकीय महाविद्यालय, कैवल्यधाम, सहभागी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी, लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिबिराला उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले.
निरोगी समाजासाठी आरोग्यविषयक जनजागृती आणि नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. भविष्यातही लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाच्या वतीने विविध समाजोपयोगी व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी सांगितले.

















