Breaking news

वडगाव मावळ येथून गावठी पिस्टल व काडतुसासह LCB ने एकाला केली अटक

वडगाव मावळ : वडगाव मावळ येथून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकाला आज पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने अटक केली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी ही माहिती दिली.

    वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील पाहिजे असलेल्या फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक घनवट यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव रेल्वे स्टेशन जवळ तलावालगत असलेल्या मोकळ्या मैदानात कुणाल बाबाजी हरपुढे (वय 18, रा. ढोरेवाडा, मोरे चौक, वडगाव मावळ) याला संशयास्पद हालचाली वरून ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीर हेतूने कमरेला लावलेले एक गावठी पिस्टल व जवळ एक जिवंत काडतुस असा 50 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

     सदर पिस्टल कोठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे पिस्टल मध्यप्रदेश येथून विकत आणल्याचे सांगत आहे. हरपुढे याला पुढील तपासाकरिता वडगाव मावळ पोलीसांकडे देण्यात आले आहे.

     ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्राण येवले, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

इतर बातम्या