Breaking news

रेल्वे प्रवाश्यांसाठी खुशखबर ; 1 सप्टेंबर पासून लोणावळा पुणे लोणावळा लोकल फेर्‍यांमध्ये वाढ

लोणावळा : रेल्वेने प्रवाश करणार्‍या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. 1 सप्टेंबर पासून लोणावळा पुणे लोणावळा लोकल गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेल्वेचे पुणे विभागाचे AOM संजय कुमार यांनी या वाढीव फेर्‍यांचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कामगार वर्गासाठी काही विशेष लोकल सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून कोरोना लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना या विशेष लोकलमधून प्रवासाची मुबा देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण वाढत असल्याने लोकलमधील प्रवासी संख्या देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा पुणे लोणावळा लोकलच्या फेर्‍या वाढविण्याची मागणी जोर धरू लागली होती. या मागणीचा विचार करता रेल्वे विभागाने ह्या फेर्‍या वाढविल्या आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार 1 सप्टेंबर 2021 पासून लोकल गाड्यांच्या खालील वेळेनुसार फेर्‍या होणार आहेत. वाचकांनी व प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी.

डाऊन मार्गावर लोणावळ्याहून पुण्यासाठी सकाळी 6.30 am, 8.20 am , 10.05 am सायंकाळी 6.20 pm व 7.35 pm वाजता लोकल सुटेल. 

अप मार्गावर पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 6.30 am, 8.05 am, सायंकाळी 4.25 pm, 6.02 pm, रात्री 8.00 pm वाजता लोकल गाड्या सुटतील.

इतर बातम्या