Breaking news

मावळ आनंदवार्ता । कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेत चांदखेडचा प्रथम क्रमांक

पुणे : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यात पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. त्यानुसार सन 2022 मध्ये खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या 11 पिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. बक्षीसाचे स्वरुप प्रथम क्रमांक 50 हजार, द्वितीय 40 हजार तर तृतीय क्रमांक 30 हजार रुपये असे आहे.

विविध गटातील प्रथम क्रमांक विजेते -

या राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये चांदखेड, जि. पुणे येथील शेतकरी नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला.  मराठवाड्यातील महिला शेतकरी श्रीमती जयश्री भीमराव डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बोरपाडळे (कोल्हापूर) येथील बाजीराव सखाराम खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. बाजरी पिकात सांगली जिल्ह्यातील विठ्ठल ईश्वर सावंत यांनी तर नाचणी पिकात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवलिंग कल्लाप्पा गावडे, मूग पिकासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सुभाष बाजीराव कर्डिले, उडीद पिकासाठी  दिपक तुकाराम ढगे तसेच भूईमुग पिकासाठी कृष्णा भाऊ चौगुले व सुर्यफूल पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सोपान कृष्णा कारंडे हे प्रथम क्रमांक विजेते ठरले आहेत. हरपळवाडी (सातारा) येथील शेतकरी प्रल्हा्द नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात तर अग्रण धुळगावचे (सांगली) संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सात पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. नांदेडच्या श्रीमती वनिता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम मिळविला आहे.

द्वितीय व तृतीय विजेते - भात पीकस्पर्धेत सर्वसाधारण गटात कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात गोपाळ खाडे व बाबूराव आप्पाजी परीट तर आदिवासी गटात पुणे जिल्ह्यातील मुरलीधर सखराम कवठे व शांताराम तुकाराम बोकड. खरीप ज्वारी सर्वसाधारण गटात जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर चिंतामण पाटील व अर्जून दामू पाटील तर आदिवासी गटात धुळे जिल्ह्यातील बिलाडया चमाऱ्या पावरा व श्रीमती सुकमाबाई खुमसिंग पावरा. खरीप बाजरी सर्वसाधारण गटात सांगली जिल्ह्यातील विठ्ठल बापू चोपडे आणि नामदेव चनबसू माळी, तर आदिवासी गटात धुळे जिल्ह्यातील  जगदीश हारु पावरा व वामन लालसिंग पावरा. मका सर्वसाधारण गटात सुमंत तुळशराम पवार आणि भिमराव राजाराम  खर्चे, तर आदिवासी गटात गंगराम वेस्ता पावरा आणि रणजित गणा पावरा. नाचणी सर्वसाधारण गटात कोल्हापूर जिल्ह्यातील बाळू लक्ष्मण भडगावकर व विष्णू धोंडिबा गावडे, तर आदिवासी गटात ठाणे जिल्ह्यातील मुसईवाडी येथील जानु ओको कामडी व पद्माकर महादु वाख. तूर सर्वसाधारण गटात अहमदनगर जिल्ह्यातील विक्रम पंढरीनाथ अकोलकर व श्रीमती बाई बुवासाहेब शिंदे, तर आदिवासी गटात दिलीप चामट्या भिल. मूग सर्वसाधारण गटात अहमदनगर जिल्ह्यातील गोरख हरीभाऊ जाधव, धोंडीभाऊ मारुती जरे, तर आदिवासी गटात श्रीमती शांताबाई पंडित चौधरी व प्रकाश हेमकांत बंकाळ. उडीद पीकासाठी सर्वसाधारण गटात नितीन सुर्यकांत शेटे आणि भागचंद्र शाहूराव उगले, तर आदिवासी गटात सखाराम कैस गावित. सोयाबीन पिकासाठी सर्वसाधारण गटात राजाराम योगाजी शिंदे व रमेश विलास जाधव, तर आदिवासी गटात नारायण मल्हारी  तुगार व श्रीमती रेखा रमेश कुमरे. भुईमुग सर्वसाधारण गटात रामचंद्र विठू कोरे आणि श्रीमती सावित्रीबाई रामचंद्र पाटील. सुर्यफूल सर्वसाधारण गटात विश्वनाथ भिमराव पाटील व भारत लक्ष्मण मुंगसे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे.

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

पीकस्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटास पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रु. 300 प्रवेश शुल्क आहे. यापुढील स्पर्धेसाठीही इच्छुक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा,असे आवाहन कृषी आयुक्त  चव्हाण यांनी केले आहे.

इतर बातम्या