Breaking news

वाॅटसअप फेसबुक इन्स्टाग्राम अचानक बंद झाल्याने सर्वांचाच सर्व्हर डाऊन झाला होता

मावळ माझा टिम : सोशल साईटस असलेले फेसबुक, वाॅटसअप, इन्स्टाग्राम एकाच वेळी डाऊन झाले. सोमवारी रात्री 9 नंतर अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वांचा सर्व्हर अचानक डाऊन झाल्याने कोट्यावधी युजर्स गोंधळून गेले. तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तब्बल 6 तासानंतर पुन्हा सुरळीत झाले आहेत.

    सोमवारी रात्री 9 नंतर अचानक मेसेज येणे बंद झाले, मेसेज जाणेही बंद झाल्याने एकच गोंधळ उडाळा. सुरुवातीला नेटवर्क कमी झाले असावे असा भास होऊन अनेकांनी मोबाईल स्विच आँफ करून पुन्हा सुरु केले पण तरी देखील अडचण येऊ लागली. नेमकी काय अडचण आहे हे स्पष्ट होत नसल्याने सर्वच नेटकरी आणि सोशल मीडिया प्रेमी एकमेकांशी मोबाईलवर संपर्क करून विचारणा करीत होते. बहुधा प्रथमच जगात एकाचवेळी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले असल्याने जगभरात प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यातच सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे समजू शकत नसल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.

   जगात लोकप्रिय असणारे वाॅटसअप हे मेसेंजिंग अँपचा सर्व्हर अचानकपणे बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या होत्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स बंद पडले होते. साधारणतः दीड ते दोन तास हा प्रकार सुरू होता. वाॅटसअप सोबत फेसबुक व इन्स्ट्राग्राम बंद झाल्याने सर्वांचा गोंधळ उडाला होता.

   सहा तासानंतर भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वाँटसअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू झाले आहे. सर्व्हर का डाऊन झाले याबाबत अद्यापही कोणतीही माहिती नसली तर यामागे सायबर हल्ला असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे तर डीएनएस अडचण निर्माण झाल्याने हा प्रकार झाला असावा असे काही तज्ञ म्हणतात.

इतर बातम्या