Lonavala News l डीआरडीओ हवालदाराची गोळी झाडून घेत आत्महत्या

लोणावळा : लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी येथे एका 36 वर्षीय डीआरडीओ हवालदार यांनी स्वतला गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6.30 वाजण्याच्या पूर्वी घडली आहे.
याप्रकरणी भूपेंद्र सिंग (वय 40, हवालदार डीआरडीओ) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. हरेंद्र सिंग (वय 36, हवालदार, डीआरडीओ, आयएनएस शिवाजी) असे या मयत झालेल्या हवालदाराचे नाव आहे.
भूपेंद्र सिंग यांनी फिर्याद दिली आहे की, ते ड्युटीवर असताना गोळी झाडल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता हरेंद्रे सिंग हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या हनुवटी, डावा डोळा आणी डोक्यास जखम होवुन रक्त येत असल्याने त्यांना तात्काळ
आयएनएस च्या कस्तुरी हॉस्पीटल नेले मात्र तो पर्यंत ते मयत झाले होते.
याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिपाली पाटील ह्या तपास करत आहेत.