सकल मराठा परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी
पिंपरी चिंचवड : सकल मराठा परिवार पिंपरी - चिंचवड, पुणे जिल्ह्या तर्फे 15 ऑगस्ट 2024 रोजी भक्ती शक्ती येथे घेण्यात आलेल्या रक्तदान व आरोग्य शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सकल मराठा परिवार ही एक बिगर राजकीय सामाजिक संघटना आहे. मराठा बांधवांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय यामध्ये मार्गदर्शन करणे हे संघटंनेचे मुख्य उद्धीष्ठ असून. मेडिकल अथवा कुठल्याही आपत्कालीन मदतीसाठी संघटना कधीही जात धर्म पहात नाही. निःस्वार्थ भावनेने मदत करत असते. संघटनेचे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सभासद असून प्रत्येक गरजू बांधवांना मदत करण्यासाठी सर्व सभासद व ऍडमिन टीम नेहमीच सज्ज असते.
भक्ती शक्ती येथील 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या उपक्रमा मध्ये 201 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच 150 जणांचे मोफत डोळे तपासणी व कॅल्शियम तपासणी करण्यात आली. त्याच सोबत अनेक गरजू रुग्ण्यांची मोफत ऑपरेशन करून देण्यासाठी नोंदणी करून घेण्यात आली व मोफत गोळ्या औषध वाटप करण्यात आले. आलेल्या सर्व ऍडमिन व स्वयंसेवक टीम ला सकल मराठा परिवार महाराष्ट्र राज्य समन्वयक दिनेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. उपक्रम पूर्ण करण्यासाठी विजय कदम, पंकज पाटील, हिरामण तांबे, वैभव ढोकळे, युवराज सुरवसे, सागर तापकीर, सुभाष पिंगळे, आनंद टमके, मनोज निर्मळ, नवनाथ मोरे, शिरीष देवरे, कैलास पडवळ, दत्ता माने संग्राम मगर, ईश्वर राऊत व सर्व ऍडमिन व स्वयंसेवक टीम ने प्रयत्न केले.