Breaking news

Maval News : त्या तपास पथकाच्या प्रमुख सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली

लोणावळा : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र उपप्राचार्य या पदावर बदली करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्यांच्या बदलीचा निघालेला आदेश तात्पुरता स्थगित करत या नवीन ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे.

     मावळ तालुक्यामधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये प्रेरणा कट्टे या प्रमुख होत्या. त्यांच्या पथकाकडून तपास सुरु असताना व काही आरोपींना अटक केलेली असताना अशा प्रकारे अचानक त्याची बदली झाल्याने मागील आठवड्यात चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर सदरची बदली तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आज मात्र पुन्हा नव्याने आदेश काढत त्यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्यांची चंद्रपूर येथे बदलीचा आदेश काढण्यात आला होता. तो स्थगित करत महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हा सुधारित आदेश काढला आहे.

इतर बातम्या