Breaking news

सोनाराच्या दुकानातुन सोने चोरणार्‍या टोळीतील आरोपीला अटक; 60 हजारांचे सोन्याचे दागीने केले जप्त

खोपोली (प्रतिनिधी) : खोपोली शहरातील सोन्याच्या दुकानातून सोन्याची चोरी करणार्‍या अटल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. तसेच त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहे. खोपोली परीसरात मागील काही दिवसापासून दिवसा चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक, रायगड अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. 

    या आदेशान्वये खालापुर उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या सुचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक राकेश कदम व विशेष पोलीस पथक यांनी घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत करुन ते जिल्हयात आणि राज्यात प्रसारीत करुन आरोपी व त्यांचे सह साथीदार यांची ओळख पटवली.

     सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी महिला हीच्यावर महाराष्ट्र राज्यातील पुणे, नवी मुंबई, मुंबई, सातारा, कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटक, हैद्राबाद राज्यात 20 ते 25 चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी महिला व तिचे फरारी साथीदार यांना पकडण्यासाठी राज्यातील पोलीस कसोशीने प्रयत्न करीत असताना रायगड पोलीसांना यश आले. सदर आरोपी महिला हिला सातारा जिल्ह्यातून खोपोली पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने खोपोली येथील ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. तिने सदरचा माल व इतर ठिकाणचा चोरून नेलेला माल तिचे सह साथीदारां मार्फत अहमदाबाद, गुजरात येथील ज्वेलर्स दुकानदार याला विक्री केल्याचे सांगितले. 

    त्याप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक राकेश कदम व स्टाफ असे विशेष पोलीस पथक अहमदाबाद, गुजरात येथे जावून त्यांनी ज्वेलर्स दुकान मालक यास ताब्यात घेवून त्याचेकडून 60 हजार रुपये किंमतीचा गुन्हयातील चोरीस गेला जप्त केले आहे.

इतर बातम्या