प्रगती एक्सप्रेसला चिंचवड थांबा, लोणावळा पुणे लोकल फेर्या वाढवा अशा विविध मागण्यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

पिंपरी चिंचवड : प्रगती एक्सप्रेस ला चिंचवड येथे थांबा देण्यात यावा तसेच सिंहगड एक्सप्रेस ला पासधारक महिलांसाठी अर्धी भोगी MST पासधारक राखीव देण्यात यावी दुपारच्या वेळेस पुणे लोणावळा, लोणावळा पुणे लोकल सुरू करण्याचा यावी, डेक्कन क्वीन एक्सप्रेस व इतर पुणे मुंबई धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या MST डब्यात नियमित तपासणी व्हावी, पुणे लोणावळा लोकल पूर्वी प्रमाणे 99 सिरिज पासून सुरु करावी, पुणे लोणावळा लोकल फेऱ्या वाढवाव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन आज पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. सोबतच DRUCC Meeting मध्ये या मागण्यांवर चर्चा करत त्या का गरजेच्या आहेत हे सांगण्यात आले असल्याचे पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी उर्फ भाईजान यांनी सांगितले.
पुणे मंडल रेल प्रबंधक श्रीमती ईंदूमती दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या DRUCC सदस्याच्या बैठकीत बशीर सुतार यांच्या वतीने रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले व वरील विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉक्टर मिलिंद हिरवे, सीनियर डीसीएम स्वप्निल नीला, सीनियर डिव्हिजन ऑपरेशन्स तसेच डी आर यु सी सी मेंबर श्री माने, श्री काची, श्री बियाणी, इक्बाल भाईजान मुलाणी, श्री बटाला, श्री चौगुले, आप्पासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.