लोणावळ्यात न्यू सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने भव्य आरोग्य, नेत्र तपासणी, रक्तदान व रिक्षा मीटर पासिंग शिबिर संपन्न
लोणावळा : न्यू सह्याद्री फाऊंडेशन, लोणावळा यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय क्र. ९, तुंगार्ली येथे भव्य आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये सुमारे ३०० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली, तर ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच अनेक नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी सुविधेचा लाभ घेतला. सुमारे 250 रिक्षा चालक-मालक यांनी रिक्षा मीटर पासिंग करून शिबिरास चांगला प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
या शिबिराचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका अनिता संदीप अंबुरे, नगरसेवक निखिल कवीश्वर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, हर्षल होगले तसेच आरटीओ अधिकारी प्रवीण हरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तपासणीअंती आवश्यक असलेल्या नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच नेत्र तपासणीही पूर्णपणे मोफत करण्यात आली. शिबिरात लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
या प्रसंगी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत संघटनेचे अध्यक्ष वसंतराव काळोखे, सदस्य ताजुद्दीन शेख, शकील बागवान, संजय पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष मंगेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती अध्यक्षा पूर्वा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर खंडेलवाल, मातोश्री ग्रुपचे सदस्य विजय इंगळे, संतोष जंगले, रुपेश नांदवटे, गणेश महाडिक, हरीश तांडेल, दीपक मोरे, गणेश आहेर, आप्पा गायखे, सोमनाथ राक्षे, संदीप ठोंबरे, राजू तारे, संदीप ठोंबरे, अक्षय मराठे, कृष्णा मराठे, अजय मराठे आदी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन न्यू सह्याद्री फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिबिरासाठी विशेष सहकार्य
1. आधार ब्लड सेंटर (एफ.डी.ए. परवाना क्र. पी.डी./६८), धनकवडी, पुणे.
2. घुबड ऑप्टिकल आणि नेत्र चिकित्सालय, तळेगाव दाभाडे.
3. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, तुंगार्ली.
4. संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा.
5. फोटोग्राफर योगेश आयकर.
6. लोणावळा नगरपरिषद.
समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविणे हा या शिबिराच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा संस्थेच्या सामाजिक कार्याला मिळालेला मोठा प्रतिसाद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व रक्तदाते, लाभार्थी, उपस्थित मान्यवर, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि स्वयंसेवक यांचे न्यू सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष संदीप पोटफोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शिबिरामागील भूमिका व संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव अनिल तावरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, सहकार्य करणाऱ्या संस्था, रक्तदाते, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले.



















