Pune Lonavala Local Train : पुणे-लोणावळा लोकल सेवेचा 45 वा वर्धापन दिन विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड : 11 मार्च, 1978 रोजी सुरु झालेल्या पुणे लोणावळा लोकल सेवेला (Pune Lonavala Local Train Service) आज 45 वर्षे पूर्ण झाली. 45 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे ईएमयु मेंटेनन्स विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्कशॅापमध्ये सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. याच निमित्ताने लोकल गाडीला फुलांनी सजविण्यात आले होते. या प्रसंगी मध्य रेल्वेचे विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक बी. के. सिंग, बी. दामोदर, सागर भिल, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष ईक्बाल (भाईजान) मुलाणी, विशाल माने, मयुरेश जव्हेरी व रजनीश कांबळे हे उपस्थित होते.
लोकलच्या फेऱ्यांबाबत विचारले असता येणाऱ्या काही काळात यार्ड रिमॅाडेलिंगचे काम सुरु झाल्यास आणखी काही लोकल शिवाजीनगर पासून सोडण्यात येणार आल्याचे सांगितले. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसला आणखी जनरल डबे जोडावेत, अशी मागणी याप्रसंगी प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक बी. के. सिंग यांचेकडे केली. त्यावर बैठक घेण्याचे त्यांनी आश्वासित केले. आता पर्यंत पुण्यात मुंबई मध्ये वापरलेले रेकचा वापर होत असल्याने येणाऱ्या काळात पुण्यासाठी मेधा बनावटीचे नवीन ईएमयु रेक मिळावेत अशी ईच्छा काही प्रवाशांनी यावेळी व्यक्त केली.