Breaking news

संत निरंकारी मिशन पुणे झोन आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 273 जणांनी केले रक्तदान

पुणे : सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच वारजे अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये 273 भक्तांनी रक्तदान केले. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी पिंपरी यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

       या शिबिराचे उदघाटन झोनल प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला रमेश कोंडे (जिल्हा प्रमुख शिवसेना), सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांच्यासह नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते. ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते. आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील 36 वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत 7473 रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत तर 12 लाख 32 हजार 497 युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला की 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

       संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात. ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

   गेल्या 15 दिवसांपासून मिशनचे सेवादार द्वारे वारजे माळवाडी, उत्तमनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती करण्यात आली होती. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार वारजे ब्रांच प्रमुख विजय कदम यांनी मानले.

इतर बातम्या