Breaking news

देवळोली धरणात बुडून 21 वर्षीय युवकाचा मृत्यू

खोपोली : देवळोली धरणावर मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रेस्कू पथकाने सहा तास शोध मोहिम राबविल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

    अरुण साहू (वय - 21, मूळ राहणार उत्तर प्रदेश) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मित्रां समवेत देवलोळी येथील धरणावर पार्टीसाठी आला होता. तो सुमार पोहणारा असल्याने पाण्यात बुडाला. पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेला सदर ठिकाणी तरुणाचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. आज सकाळपासून अपघातग्रस्तांची टीम आणि कोलाड रिवर राफ्टींगची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि जवळपास सहा तासाच्या अथक सर्च ऑपरेशन नंतर सदर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. पोहता येत नसेल तर तरुणांनी पाण्यात जाणे टाळावे असे आवाहन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेने सर्व पर्यटकांना व स्थानिकांना केले आहे.

इतर बातम्या